मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला सुपरवेग; जपानने पहिल्यांदाच शेअर केले फोटो, पाहा कशी असेल बुलेट ट्रेन ?

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला (Bullet Train Projects) गती मिळताना दिसत आहे. नुकतीच भारतात जपानी दुतावासाने बुलेट ट्रेन ई-५ सिरीज शिंकनसेन (E5 Series Shinkansen) चे फोटो प्रसिध्द केले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर केवळ २ तास पूर्ण करता येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) हायस्पीड रेल्वे कॉरिडारला भारत सरकारने मंजुरी दिली होती. या अंतर्गत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. जपान यासाठी सहकार्य करीत आहे. त्यामुळे जपानने पहिल्यांदाज फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला (Bullet Train Projects) गती मिळताना दिसत आहे. नुकतीच भारतात जपानी दुतावासाने बुलेट ट्रेन ई-५ सिरीज शिंकनसेन (E5 Series Shinkansen) चे फोटो प्रसिध्द केले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर केवळ २ तास पूर्ण करता येणार आहे.

बुलेट ट्रेनमध्ये काही बदल केले जाणार आहेत. जेणेकरुन त्याचा उपयोग मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पात रोलिंग स्टॉक म्हणजेच रेल्वेत वापरल्या जाणाऱ्या गाड्या आणि वॅगन्स म्हणून करता येईल. यामुळे भारतीय रेल्वे प्रणाली अधिक गती मिळणार आहे. सुरवातीला गुजरातमध्ये या प्रकल्पाला वेग आला होता. मात्र जमिनींबाबतच्या प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील काम संथ गतीने झाले.

काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच सिग्नल, टेलिकॅाम आणि रोलिंग स्टॉकची कामे जपानी कंपन्या करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. २०१८ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे म्हटले होते, की भारतातील बुलेट ट्रेनची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जपान कटिबद्ध आहे.