सुशांत राजपूतचे व्यावसायिक भागीदार वरुण माथूर ईडी कार्यालयात दाखल

ईडीने सुशांतच्या व्यावसायिक भागीदारीत असलेले वरुण माथुर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. वरुण माथूर ईडी कार्यालयात दाखल झाले. सुशांतसिंग राजपूत यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार वरुण माथुर यांना ईडीने वरुण येथे बोलावले.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास  (Sushant Rajput’s Death Case) सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक प्रकरणांचा खुलासा होत आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाला अनेक घटनांचा रंग लागला आहे. सीबीआयला या प्रकरणात आर्थिक घोटाळा तसेच मादक पदार्थांच्या टोळीपर्यंतचे धागेदोरे सापडले आहे. यावरुन सुशांत आणि रिया चक्रवर्तीच्या संबंधित लोकांची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहेत.(Sushant Rajput’s business partner Varun Mathur enters ED office)


ईडीने सुशांतच्या व्यावसायिक भागीदारीत असलेले वरुण माथुर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. वरुण माथूर ईडी कार्यालयात दाखल झाले. सुशांतसिंग राजपूत यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार वरुण माथुर यांना ईडीने वरुण येथे बोलावले. काल सुशांत प्रकरणात ईडीने गौरव आर्य यांची चौकशी केली होती. रियाचे वडील इंद्रजीत यांच्यासह रिया आणि तिचा भाऊ शोविक यांना यापूर्वी ईडीने चौकशी केली होती.