सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे ; पार्थ पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सत्यमेव जयते!, असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तसेच राम मंदिराच्या निर्माणाला शुभेच्छा दिल्या होत्या.

मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशा प्रकारची मागणी शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता, थेट सीबीआयकडे देण्याचा आदेश दिल्यानंतर पार्थ पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

सत्यमेव जयते! असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तसेच राम मंदिराच्या निर्माणाला शुभेच्छा दिल्या होत्या.

या दोन्ही भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेशी विसंगत असल्यानं शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीर फटकारलं होतं. त्यामुळे पवार कुटुंबात वादळ निर्माण झालं होतं. मात्र हे प्रकरण शांत होत नाही, तोच पार्थ पवार यांची भूमिका योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं समोर आलं आहे. दरम्यान, पार्थ पवार यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.