शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडाला एनसीबीकडून अटक

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यूचा (death) तपास सीबीआय (CBI) कडे सोपवल्यानंतर नवी माहिती समोर आली होती. दरम्यान, ड्रग्स कनेक्शनशी निगडीत एनसीबी (NCB) द्वारे मोठी कारवाई केली सुरू आहे. एनसीबीनं रिया चक्रवर्ती (rhea chakraborthy)चा भाऊ शोविक चक्रवर्ती (showik chakraborthy) याच्यासह सॅम्युअल मिरांडा(samual miranda) लाही अटक (arrested) केली आहे. यापूर्वी एनसीबी आज कोणतीही अटक होणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु एनसीबीच्या चौकशीनंतर त्यांना काही कायदेशीर बाबींची पूर्तता करून अटक करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी सॅम्युअल मिरांडाच्या घरावर एनसीबीनं छापा (raid) टाकला होता आणि चौकशीसाठी शोविकलाही सोबत नेलं होतं.

शोविकला लवकरच अटक होऊ शकते असं असं एनसीबीचे उप-महासंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं होतं. सकाळपासूनच शोविकच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती. रियाच्या घरावर छापा टाकल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम शौविक चक्रवर्तीला सोबत घेऊन गेली होती. शोविकची ड्रग पेडलरसोबत चौकशी करण्यात आली होती.

सुशांत प्रकरणी आज सकाळपासूनच एनसीबी ॲक्शन मोडमध्ये होती. पहिल्यांदाच कोणती टीम तपासासाठी रियाच्या घरी पोहोचली होती. तसंच त्यांची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर एनसीबीची टीम आपल्यासोबत शोविकला घेऊन गेली होती. याप्रकरणी ड्रग्स कनेक्शनबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शोविक सोबत अटक केलेल्या ड्रग पेडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी केली. सर्वांना एकत्र बसवून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाचीही कसून चौकशी करण्यात आली.