सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण; काँग्रेने उपस्थित केले अनेक सवाल

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही सीबीआय अंतिम निष्कर्ष केव्हा सांगणार? असा सवाल केला आहे. सावंत यांनी ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष, सीबीआय चौकशीला 310 दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला 250 दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे? सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे, असे सावंत म्हणाले.

    मुंबई : सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही सीबीआय अंतिम निष्कर्ष केव्हा सांगणार? असा सवाल केला आहे. सावंत यांनी ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष, सीबीआय चौकशीला 310 दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला 250 दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे? सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे, असे सावंत म्हणाले.

    सावंत यांनी अँटिलिया प्रकरणावरुन देखील प्रश्न उपस्थि केले आहेत. जर अँटिलीया कट रचणारे वाझेसह सर्व पोलिस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते तर एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? काही गुप्त करार झाला आहे का? जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटिलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे. मविआला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु अखेर सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवा, असे सावंत यांनी म्हटले आहे.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांनी गेल्या वर्षी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास सीबीआयकडे सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सुशांतच्या मृत्यूला वर्ष पूर्ण झालं असून सीबीआयने आता त्याच्या तपासाविषयी माहिती दिली आहे. ‘सुशांतच्या मृत्यूशी संबंधित तपास अद्यापही सुरू आहे आणि या प्रकरणातील सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे’, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    हे सुद्धा वाचा