sushant rajput, parambir singh

मुंबई पोलीस आयुक्तांनी म्हटलंय ‘ज्यांनी कोणत्याही माहितीविना आमच्या तपासावर प्रश्न पस्थित केले, विविध वृत्तवाहिन्यांवर जाऊन टीका करणारी वक्तव्ये केली. त्यांच्याकडे काही माहिती असेल, तर ती जाहीर करावी असे आव्हान मी त्यांना देतो. तपास पूर्णपणे गोपनीय होता.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात AIMS चा रिपोर्ट समोर आल्यानंतर, मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांनी उत्तर दिले आहे. अहवालात जो निष्कर्ष काढण्यात आलाय, त्याबाबत अजिबात आश्चर्य वाटले नाही. अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांनी म्हटलंय ‘ज्यांनी कोणत्याही माहितीविना आमच्या तपासावर प्रश्न पस्थित केले. विविध वृत्तवाहिन्यांवर जाऊन टीका करणारी वक्तव्ये केली. त्यांच्याकडे काही माहिती असेल, तर ती जाहीर करावी, असे आव्हान मी त्यांना देतो. तपास पूर्णपणे गोपनीय होता. जी काही टीका झाली, ती विशिष्ठ स्वार्थासाठी आणि हेतूपुरस्कृत अभियानाचा भाग होती’

सुशांतसिंहची हत्या नव्हे, तर आत्महत्याच होती, असा निष्कर्ष AIIMS च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपविल्याची माहिती आहे. या निष्कर्षाबाबत परमबीर सिंह यांच्याकडे विचारणा केली असता, ‘या निष्कर्षाबाबत आम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही. हाच निष्कर्ष कपूर रुग्णालयाची टीम आणि मुंबई पोलिसांच्या तपासातही समोर आला होता.’ सुशांतसिंहचा मृत्यू ही आत्महत्येचीच केस असल्याचे गृहित धरुनच मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासून चौकशी सुरु केली होती.

सुशांतच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची चौकशी सर्वात पहिल्यांदा मुंबई पोलिसांनीच सुरु केली होती. याप्रकरणी एफडीआर दाखल करण्यात आला होता, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ५० हून अधिक जणांचें जबाबही नोंदवण्यात आले होते. यानंतर सुशांतसिंहच्या वडिलांनी याप्रकरणी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरण आणि इतर कलमांच्या आधारे बिहार पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल झाले, आणि नंतर सीबीआयकडे सोपविण्यात आले.