लसीच्या किंमती कमी जास्त केल्याने संशय, पुनावाला स्वतः जबाबदार : नवाब मलिक 

सिरमचे प्रमुख पुनावाला यांचे वर्तन संशय निर्माण करणारे असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत, त्यांना कोणीही बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

    मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे. असं पुनावालांनी सांगितलं. याचं पार्शवभूमीवरकेंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पीटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे सिरमचे प्रमुख पुनावाला यांचे वर्तन संशय निर्माण करणारे असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत, त्यांना कोणीही बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

    दरम्यांन माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की,  पुनावाला जे काही सांगत आहेत त्यात सुरुवातीला राज्याला ४०० रुपयांनी लस देणार असल्याचे सांगितले. मग त्यांनी ३०० रुपये भाव स्वतः जाहीर केला. हे सगळे संशय निर्माण करणारे विषय आहेत. ज्या पध्दतीने ४०० रुपये किंमत ठरवतात आणि नंतर व्टिट करुन ३०० रुपयाला द्यायला तयार आहे असे सांगितले. हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे नवाब मलिक म्हणाले.