स्वप्ना पाटकर यांना सर्शत जामीन; संजय राऊतांवर केला होता गंभीर आरोप

सन २०१३ आणि २०१८ मध्ये कलीना येथे राहणाऱ्या डॉ. स्वप्ना पाटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातच पाटकर या बोगस डिग्रीचा वापर करून मागील दोन वर्षांपासून सिटी रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञाची प्रॅक्टिस करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि ८ जून रोजी पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याविरोधात पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

    मुंबई :  बोगस डीग्रीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मराठी चित्रपट निर्मात्या आणि मानसोपचार तज्ज्ञ स्वप्ना पाटकर यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच अटीशर्तींवर खंडपीठाने जामीन दिला.

    सन २०१३ आणि २०१८ मध्ये कलीना येथे राहणाऱ्या डॉ. स्वप्ना पाटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातच पाटकर या बोगस डिग्रीचा वापर करून मागील दोन वर्षांपासून सिटी रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञाची प्रॅक्टिस करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि ८ जून रोजी पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याविरोधात पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

    त्यावर न्या. एस. एस. शिंदे आमि न्या. एन. जे. जमादार यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, सदर प्रकरणी पोलिसांना चौकशी तसेच तपास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने पाटकर यांना जामीन मंजूर केला. पासपोर्ट न्यायदंडाधिकारी न्यायालयात जमा करण्याचे, चौकशी आणि तपासात सहकार्य करण्याचे तसेच पुढील महिनाभर प्रत्येक सोमवारी नजिकच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी ६ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.