Swine flu tension in Mumbai! In the last six months, 19 patients were found

मुंबईत मागील सहा महिन्यात ११ जुलै पर्यंत स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण आढळून आले. यात केवळ जुलै महिन्यातच १२ रुग्ण आढळले असल्याचे पालिका आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. यामुळे मुंबईकरांना आता काेराेनाबराेबर साथीच्या आजारांचाही सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे साथीच्या आजारांमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहे. यामुळे मुंबईकरांनी आराेग्याची काळजी घ्यावी, ताप आल्यास त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, पाणी उकळून पिणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे असे आवाहन पालिका आराेग्य विभागाने केले आहे.

    मुंबई : मुंबईत साथीच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे मागील काही दिवसांपासून समाेर येत आहे. साथीचा ताप, खाेकला. सर्दी, मलेरिया, डेंग्यू,लेप्टाे या आजारांनी पुन्हा डाेके वर काढले आहे. याचबराेबर आता स्वाईन फ्लूचे रुग्ण देखील शहर व उपनगरात आढळून येत असल्याने पालिका आराेग्य विभागाने अलर्ट राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण पालिकेच्या सहा वाॅर्डमध्ये आढळून येत असल्याचे पालिका आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.

    मुंबईत मागील सहा महिन्यात ११ जुलै पर्यंत स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण आढळून आले. यात केवळ जुलै महिन्यातच १२ रुग्ण आढळले असल्याचे पालिका आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. यामुळे मुंबईकरांना आता काेराेनाबराेबर साथीच्या आजारांचाही सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे साथीच्या आजारांमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहे. यामुळे मुंबईकरांनी आराेग्याची काळजी घ्यावी, ताप आल्यास त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, पाणी उकळून पिणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे असे आवाहन पालिका आराेग्य विभागाने केले आहे.

    पालिकेच्या डी विभागात स्वाइन फ्लूचे रुग्ण अधिक !

    पालिका आराेग्य विभागाच्या अनुसार, जुलै मध्ये स्वाईन फ्लूचे १२ रुग्ण अाढळून अाले असून यात पािलकेच्या डी विभागा अंतर्गत येत असलेल्या मलबार हिल, ताडदेव, ग्रॅंटराेड, वरळी (जी दक्षिण), अंधेरी-पूर्व (के/पूर्व), अंधेरी- पश्चिम (के/पश्चिम), गाेरेगाव (पी- दक्षिण) व मुलुंड (टी वाॅर्ड) मध्ये आढळून आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. गत वर्षी जुलै २०२० मध्ये स्वाईन फ्लूचा एकच रुग्ण आढळला हाेता. पण यंदाच्या वर्षी ११ दिवसात स्वाइन फ्लूचे १२ रुग्ण आढळले आहे.