मुंबईत वकिलावर तलवारीने हल्ला; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे.

    मुंबई. मुंबईत एका वकिलावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना असल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

     

    तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.