T-Series company owner and 'cassetting' Gulshan Kumar murder case; Accused's life sentence upheld

एप्रिल 2002 मध्ये या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एल तहिलयानी यांनी आपला निकाल जाहीर करताना 19 पैकी 18 आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोश मुक्त केले होते, तर गुलशनकुमार यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या अब्दुल रौफला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला रौफने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निर्णय जाहीर केला.

    मुंबई : टी-सीरीज कंपनीचे मालक आणि ‘कॅसेटकिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट या मारेकऱ्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला आणि सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधातील आव्हान खंडपीठाने फेटाळून लावले. शिक्षेदरम्यान मिळालेली पॅरोल तोडून, पळून जाऊन आरोपी जर गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवत असेल तर तो कोणत्याही माफीस लायक नाही, असे निरीक्षण खंडपीठाने जारी केलेल्या आदेशात नोंदवले.

    एप्रिल 2002 मध्ये या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एल तहिलयानी यांनी आपला निकाल जाहीर करताना 19 पैकी 18 आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोश मुक्त केले होते, तर गुलशनकुमार यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या अब्दुल रौफला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला रौफने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निर्णय जाहीर केला.

    त्यानुसार, रौफ, दाऊद मर्चंटला कोणताही दिलासा देण्यास खंडपीठाने नकार दिला. तर अन्य निर्दोष आरोपी अब्दुल मर्चंटविरोधातील राज्य सरकारने केलेले अपील खंडपीठाने अंशत: मान्य केले. तसेच, पुराव्यांअभावी निर्दोश मुक्त केलेल्या ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांनाही दिलासा देत खंडपीठाने त्याचे निर्दोषत्व कायम ठेवले.