चर्चेच्या फेऱ्या बंद करुन लवकरात लवकर निर्णय घ्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा

शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी देशव्यापी आंदोलन करु असा इशारा देशातील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच रविवारी चलो दिल्ली अशी हाक दिली आहे. राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीमध्ये पोहचले आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंहा दिला आहे.

दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १७वा दिवस आहे. गेल्या १९ दिवसानंतर शेतकरी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या १९ दिवसाच्या आंदोलनात एकूण ११ शेतकऱ्यांनी आपले प्राणही गमावले आहेत. या आंदोलनावर राज्यातील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार शेतकरी कायदे रद्द न करण्यावर ठाम असल्यामुळे दिवसेंदिवस आंदोलनाचे स्वरुप तीव्र होत आहे.

शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी देशव्यापी आंदोलन करु असा इशारा देशातील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच रविवारी चलो दिल्ली अशी हाक दिली आहे. राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीमध्ये पोहचले आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंहा दिला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले हे काळे कायदे मागे हटविल्याशिवय आम्ही हटणार नाही असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच चर्चेच्या फेऱ्या खुप झाल्या त्यामुळे आता निर्णय घ्या अशी भूमिका यावेळी राजू शेट्टी यांनी मांडली आहे.

शेतकरी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. आंदोलन कसे केले पाहिजे हे शेतकऱ्यांकडून शिकले पाहिजे. जो नियम उसाला आहे तोच निय़म बाकी पिकांना लागू झाला पाहिजे अशी तरतूद करावी असा खाजगी विधेयक २०१८ साली खासदार असताना मांडले होते. याला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला होता. असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.