कोरोनाचं उल्लघंन केल्यामुळे अनिल देशमुखांना अटक करा; सुधीर मुनगंटीवारांची मागणी

१५ तारखेला अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचं उल्लघंन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन अटक करा. अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

    मुंंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राने प्रचंड खळबळ उडवली आहे. त्या पत्रातून सिंह यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे. या प्रकरणावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर आज राज्यपालांची भेट घेणार आहे. अशी माहिती मुनगंटीवर यांनी माध्यमाशी बोलतांना दिली.

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माध्यामाशी बोलताना म्हणाले की, ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे, असं पवारांनी दावा केला. त्यावर आता विरोधकांनी आता खुलासा केला आहे. १५ तारखेला अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचं उल्लघंन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन अटक करा. अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

    दरम्यान २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत देत जनतेने मतरुपी आशीर्वाद दिला होता. पण नंतर बेईमानी पद्धतीने महाविकास आघाडी सरकार आलं. जनेतची थट्टा करत जनतेच्या हितासाठी काम करू असं आश्वस्त केलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडतंय ते धिंडवडे काढणारे आहे. असं मुनगंटीवार म्हणाले.

    परमबीर सिंग यांनी केलेला आरोप गंभीर आहे, शपथ घेतलेले मंत्री जर आकस भाव दाखवत असतील तर घटनेच्या आधारावर राज्यपाल महोदयांनी राज्याची संपूर्ण परिस्थितीची माहिती राष्ट्रपतींना पाठवावी, अस सुधीर मुनगंटीवार बोलत होते. तसेच उद्या महाराष्ट्रात आतंकवाद, अशी घटना झाली तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल. असा गंभीर आरोपही त्यांनी केला.