Ajit Pawar Income Tax Raids

‘भाजपचे देखील अनेक कारखाने आहेत, त्यापैकी एकावर पण कारखान्यावर कारवाई का नाही. आधी कारवाई करायची, मीडियात मोठी प्रसिद्धी द्यायची आणि नंतर तो निर्दोष सुटतो,  मी या कारवाईचे उत्तम उदाहरण.’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या आता नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संदर्भात राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

    मंत्री भुजबळ म्हणाले की, ‘भाजपचे देखील अनेक कारखाने आहेत, त्यापैकी एकावर पण कारखान्यावर कारवाई का नाही. आधी कारवाई करायची, मीडियात मोठी प्रसिद्धी द्यायची आणि नंतर तो निर्दोष सुटतो,  मी या कारवाईचे उत्तम उदाहरण.’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

    अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही

    तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ‘अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही.’

    मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले की, ‘आघाडी सरकार जाण्याचा प्रश्न संपलेला आहे. सरकार जात नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने छापे टाकणे आणि एजन्सीचा गैरवापर करणे हा उद्योग सुरू झाला आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. भुजबळांना असाच त्रास दिला. शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला. आमचे सर्व नेते सर्व ठिकाणी निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांनी केलेला नसताना केवळ धाडसत्रे करून त्यांना बदनाम केले जात आहे.’ असा आरोप पाटील यांनी केला आहे.