सध्याच्या टाळेबंदी निर्बंधाबाबत सर्व पालकमंत्र्याशी बोलून उद्या आढावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार असून त्यात राज्याच्या सर्वपालकमंत्री आणि पालक सचिवांकडून जिल्हानिहाय कोरोना स्थितीच्या आकडेवारीचा अंदाज घेतला जाणार आहे. राज्यात सध्या कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचे गेल्या तीन दिवसांतील आकडेवारीवरून दिसून आले असून सध्या जमावबंदी आणि कडक निर्बंध आणखी काही दिवस लागू राहण्याची शक्यता आहे.

  मुंबई :  राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील सध्याच्या टाळेबंदी निर्बंधाबाबत सर्व पालकमंत्र्याशी बोलून उद्या आढावा घेतला जाईल त्यानंतर सध्याचे निर्बंध वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दिल्ली सरकारने आज टाळेबंदी आणखी आठ दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जमावबंदी निर्बंध आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

  कोरोना स्थितीच्या आकडेवारीचा अंदाज

  उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार असून त्यात राज्याच्या सर्वपालकमंत्री आणि पालक सचिवांकडून जिल्हानिहाय कोरोना स्थितीच्या आकडेवारीचा अंदाज घेतला जाणार आहे. राज्यात सध्या कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचे गेल्या तीन दिवसांतील आकडेवारीवरून दिसून आले असून सध्या जमावबंदी आणि कडक निर्बंध आणखी काही दिवस लागू राहण्याची शक्यता आहे.

  महाराष्ट्र दिनी मोफत लस

  राज्यात १८ वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लस देण्याची घोषणा होणार असल्याचे संकेतही पवार यांनी दिले. कोरोना लसीकरणासाठी जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  १ मे रोजी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका सांगतील. ग्लोबल टेंडर काढू. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही, आमची क्षमता आहे तेवढी देऊ. ग्लोबल टेंडरमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख असेल.

  अजित पवार, उपमुख्यमंत्री

  साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती

  ऑक्सिजनबाबत जे बंद पडलेले प्लांट आहेत, ते सुरु करत आहोत. काही वीजेअभावी बंद होते, काही फायनान्सिअली बंद होते. ते सुरु करत आहोत. पवारसाहेबांनी सूचना केली आहे, साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जामनगरचा जो कोटा आहे तो वाढवला नसला तरी कमी करु नका अशी केंद्राला विनंती केली आहे, असे अजित पवार म्हणाले.