raj thackeray

राज ठाकरे यांनी ट्विट करत महात्माह गांधींना अभिवादन केले. राज ठाकरे अभिवादन करत म्हणाले की, आज महात्मा गांधी जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं ह्यातच गांधींना अडकवलं गेलं आहे.

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांची १५१ वी जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील महात्महा गांधींना अभिवादन (Greet) केले आहे. महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन करतान राजकारणी नेत्यांनाही कानपिचक्या ( politicians) दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी ट्विट करत महात्माह गांधींना अभिवादन केले. राज ठाकरे अभिवादन करत म्हणाले की, आज महात्मा गांधी जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं ह्यातच गांधींना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि एखादी चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयांकडून त्यावर भूमिका घेताना, ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातय.

त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझ नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे, हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिपेक्षातून त्यावर व्यक्त होणं, न होणं हे सुरु झालं आहे.

‘बोलणे हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरुर बोला’ हे त्यांच तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींच प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तर सापडतील. महात्मा गांधींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन.