कोविड काळात कामा रुग्णालयाचा सावळा गोंधळ समोर

उपचारादरम्यान कामा रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी समितीच्या अहवालानुसार दिसतंय. या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर प्रकृती गंभीर होत असतानाही, तसेच रुग्णालयात तज्ञ उपस्थित नसतानाही, या महिलेवर उपचार कामामध्ये सुरू ठेवण्यात आले. या मृत्यूनंतर ८-६-२०२१ समितीची एक बैठक झाली होती. या बैठकीत या विषयी अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आल आहे. या अभ्यासात तज्ञांनी काही मतं नोंदवली, त्यात काम रुग्णालया दोषी आढळून आले आहे.

  मुंबई : स्नेहा अशोक मोकाशे या २८ वर्षीय महिलेचा कोविड आजाराने १७ मे २०२१ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला झाला होता. जिल्हास्तरीय “माता मृत्यू अन्वेषण समिती” कडून या प्रकरणा संदर्भात एक अहवाल तयार करण्यात आला आहे. या समितीत विविध प्रकारचे तज्ञ डॉक्टर असतात, या समितीतील तज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार कामा रुग्णालयात ही केस गेली असतात, उपचारादरम्यान कामा रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी समितीच्या अहवालानुसार दिसतंय. या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर प्रकृती गंभीर होत असतानाही, तसेच रुग्णालयात तज्ञ उपस्थित नसतानाही, या महिलेवर उपचार कामामध्ये सुरू ठेवण्यात आले. या मृत्यूनंतर ८-६-२०२१ समितीची एक बैठक झाली होती. या बैठकीत या विषयी अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आल आहे. या अभ्यासात तज्ञांनी काही मतं नोंदवली आहेत. त्यानुसार कामा रुग्णालयात ही महिला २८-०४-२०२१ महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली, तर १७-०५-२०२१ ला महिलेचा मृत्यू झालाय.

  अहवालात काय म्हटलंय

  – महिला उपचसासाठी सौम्य कोविड लक्षण असताना कामा रुग्णालयात मध्ये दाखल झाली, तेव्हा तिला उपयुक्त प्राणवायू पुरवठा करण्यात आला.

  – त्यानंतर फ्लेगझोन इंजेक्शन (रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन) ते डी डायमर ( रक्तातील गाठी ते पाहण्यासाठी ही चाचणी केली जाते) चाचणी केल्यानंतर हे इंजेक्शन दिलं जातं, पण ती चाचणी न करता हे इंजेक्शन या महिलेला देण्यात आलंय

  – रुग्ण ९ महिन्यांची गरोदर होती, त्यामुळे रुग्णाला श्वासनास त्रास होत असेल तर महिलेची प्रसूती करून उपचार वेळेत सुरू करणे गरजेचे होते. पण रुग्ण अत्यवस्थ होऊनही प्रसूती वेळेत केली गेली नाही. त्यामुळे महिलेला श्वासनास आणखी त्रास वाढला

  – औषध वैद्यकियशास्त्र तज्ञ कोविड उपचारसाठी असणारे तज्ञ रुग्णाला हाताळत असतात, त्यांच्याकडूनच उपचार होणं आवश्यक असते, परंतु कामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊनही ५ दिवस या महिलेला तज्ञांच्या उपचारांपासून दूर ठेवण्यात आलं, त्यामुळे योग्य उपचार न मिळून ही महिला अत्यवस्थ होत गेली

  – नियमित तपासणी झाली नाही, असं समितीच्या निदर्शनास आले

  – ही रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आला, त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे .

  या गोष्टीचं पालन करायला हवं होतं

  – कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार व्हायला हवं होतं, पण रुग्णलायाकडून ते झालं नाही

  – ९ महिने उलटून गेल्यामुळे महिलेची प्रसूती वेळेत होणं अत्यंत गरजेचं होतं, जेणेकरून महिलेला श्वासोश्वासासाठी त्रास झाला नसता, पुढचे उपचार सोप्पे होऊन जीव वाचला असता

  – माता मृत्यू कमी करणयासाठी कोविड रुग्णांना विविधतज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपचार देणं गरजेचे होते, पण तशी कोणतीही व्यवस्था न करता रुग्णालयानी  स्वतःचा उपचार देण्यास सुरुवात केली

  – औषध वैद्यकशास्त्रकडूनच पहिल्या दिवसापासून कोविड रुग्णाला हाताळलं पाहिजे होतं.

  कोविड काळात अनेक मृत्यूच्या घटना घेडलेल्या आहेत, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. कामासारख्या राज्यभरात नावाजलेल्या रुगणालायतच या विषयी गांभीर्य पाळलं गेलं नसल्याचं याप्रकरणातून समोर आलेलं आहे. डॉक्टरानी उपचार देणं हे कर्तव्य असलं,  तरी त्या विषयाच्या तज्ञ डॉक्टरांनीच संबंधित रुग्णाला हाताळायला हवं, पण प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे एका निष्पाप मातेचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र यासंदर्भात रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी “या संदर्भात मला माहिती नाही, संबंधित विभागांशी बोलून, आणि माहिती घेऊन आपण बोलू” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र या प्रकरणात निष्पाप आईचा बळी गेला आहे. आता याची गंभीर दखल घेऊन काय कारवाई संबंधितांवर होणार हे पाहणं महत्वाचं असेल.