खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा; चित्रा वाघ यांचे अवाहन

महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचे पोलिस दलात काम करणाऱ्या महिला पोलिसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा, असे आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत हे आवाहन केले.

    मुंबई : महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचे पोलिस दलात काम करणाऱ्या महिला पोलिसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा, असे आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत हे आवाहन केले.

    राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असतानाच आता पोलिस दलातील महिलाही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांना आपली व्यथा मोकळेपणाने मांडता यावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस दलात महिलांचा समावेश केला. त्यांचा हा निर्णय कितपत यशस्वी झाला आहे?, असा सवाल वाघ यांनी निवेदनात केला आहे.

    पोलिस दलातील महिलाच आज पोलिस दलातील पुरुष सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही गोष्ट शोभनीय नाही. ही अत्यंत शरमेची बाब आहे. राज्यातील आयाबहिणींचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहेच. पण पोलीस दलात काही विकृत पोलीस असून ते आपल्या महिल्या सहकाऱ्यांवरच अत्याचार करत आहे. या घटनांचा आलेख वाढत असून हे चित्रं भयावह आणि चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.