चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शाळांना आर्थिक मदतीची गरज – शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा फटका अनेक घरांसोबतच कोकणातील शाळांनाही बसला असून राज्य सरकारने तातडीने शाळांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जनता शिक्षक महासंघ कोकण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव

 मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा फटका अनेक घरांसोबतच कोकणातील शाळांनाही बसला असून राज्य सरकारने तातडीने शाळांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जनता शिक्षक महासंघ कोकण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. जनता शिक्षक महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी तसेच सिंंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील शाळांना फटका बसला असून अनेक शाळांचे छप्पर, कौले व पत्रे उडाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईची पाहणी प्रत्यक्ष शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी. त्यानंतर आपला अहवाल सरकारला पाठवावा. यासोबतच स्थानिक विधानसभा व विधान परिषद सदस्यांच्या निधीतून शाळांना मदत करण्याबाबत शासनाने निर्देश द्यावेत, असेही अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.