शिक्षकांना गणेशोत्सवाची सुट्टी मंजूर

मुंबई  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणावर सध्या भर देण्यात येत असताना आता शिक्षकांना गणेशोत्सवाची सुट्टी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना २१ ते २८ ऑगस्टदरम्यान सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. 

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना शिक्षकांसह २१ ते २८ ऑगस्टदरम्यान आठ दिवस गणेशोत्सवानिमित्त सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही सुट्टी देताना काही अटी व शर्थी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमच्या तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ५ वी साठी २०० कार्यदिन प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे ८०० घड्याळी तास पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ६ वी ते ८ वी साठी २२० कार्यदिन प्रत्येक वर्षात प्रत्यक्ष अध्यपानाचे एक हजारी घड्याळी तास पूर्ण होणे आवश्यक असल्याचे बंधनकार केले आहे. रायगड जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शितल पुड यांनी परिपत्रकाद्वारे ही सुट्टी जाहीर केली आहे.