लसीकरणाची कारणे न देता शिक्षकांनी उपस्थित राहावे; शिक्षण आयुक्तांचे सर्व शाळांना आदेश

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे, कोविड लसीकरण झाले नाही या कारणास्तव शाळांत अनुपस्थित राहता येणार नाही असे आदेश देत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची १०० टक्के हजेरी असणे बंधणकारक असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत(reopening of schools in maharashtra).

    मुंबई: राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे, कोविड लसीकरण झाले नाही या कारणास्तव शाळांत अनुपस्थित राहता येणार नाही असे आदेश देत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची १०० टक्के हजेरी असणे बंधणकारक असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत(reopening of schools in maharashtra).

    राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात यावी, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत. तसेच कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले नाही, असे कारण देऊन कोणत्याही शिक्षकाला किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे व ज्या शिक्षक व शिक्षकेत्तरांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे.

    तसेच ज्या शिक्षकांचे लसीकरण झाले नाही अशा शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधनकारक असणार आहे. असेही आयुक्तांनी शाळांना दिलेल्या मार्गदर्शन सूचनांत स्पष्ट केले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक कामकाजासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांना शाळेवरती रुजू होण्यासाठी कोरोनाच्या कामाकाजातून मुक्त करण्याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेस कळवून शिक्षक शाळा स्तरावर लवकरात लवकर रूजू होतील याची दक्षता घेण्याची सूचनाही सोळंकी यांनी दिली आहे.