Tears of crew members: Navy rescue operations; 75 people are still missing and 26 bodies have been found

दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, असे सांगतानाच ‘पी ३०५’ बार्जवरील क्रू मेंबर्सला आपल्या भावना अनावर झाल्या आणि अश्रुधारा वाहिल्या. चक्रीवादळामुळे वादळात समुद्रांच्या लाटांमध्ये बार्ज पी ३०५ बुडाली. तर या बार्जवरील क्रू मेंबर्सने बचावासासाठी समुद्रात उड्या मारल्या. तब्बल २४ तास ते मृत्यूशी लपंडाव खेळत होते. बचाव कार्यादरम्यान भारतीय नौदलाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, अशा परिस्थिती सुद्धा भारतीय नौदलाच्या आयएनएस कोचीने १८६ जणांना सुखरूप वाचवले आहे. यापैकी १२५ जणांना मुंबईतील नेवल डॉक येथे आणण्यात आले.

  मुंबई : दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, असे सांगतानाच ‘पी ३०५’ बार्जवरील क्रू मेंबर्सला आपल्या भावना अनावर झाल्या आणि अश्रुधारा वाहिल्या. चक्रीवादळामुळे वादळात समुद्रांच्या लाटांमध्ये बार्ज पी ३०५ बुडाली. तर या बार्जवरील क्रू मेंबर्सने बचावासासाठी समुद्रात उड्या मारल्या. तब्बल २४ तास ते मृत्यूशी लपंडाव खेळत होते. बचाव कार्यादरम्यान भारतीय नौदलाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, अशा परिस्थिती सुद्धा भारतीय नौदलाच्या आयएनएस कोचीने १८६ जणांना सुखरूप वाचवले आहे. यापैकी १२५ जणांना मुंबईतील नेवल डॉक येथे आणण्यात आले.

  नौदलाच्या आयएनएस कोच्चीने बुधवारी १८८ जणांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. यापैकी ‘पी बार्ज’चे १८६ क्रू मेंबर्स होते आणि दोन सदस्य टग वारप्रदाचे होते. सोबतच २६ मृतदेहही समुद्रात आढळले. नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘पी ३०५’मध्ये एकूण ३०५ कर्मचारी होते. त्यापैकी ७५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
  अरबी समुद्रात आलेल्या वादळामुळे समुद्र खवळला होता. उंचच उंच लाटा उसळत होत्या. समुद्रसपाटीपासून ७० किलोमीटर अंतरावर जहाजात अडकून पडलो. सुरक्षेसाठी लावलेले जहाजांचे नांगरही तुटल्याने ते हेलकावे खात बुडू लागले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता जीव वाचविण्यासाठी उसाळलेल्या समुद्रात थेट उड्या मारल्या. अखेर २४ तासांनंतर भारतीय नौसेना, कोस्ट गार्डच्या मदतीने आम्हाला बाहेर काढण्यात आले, अशी प्रतिक्रिया समुद्रातून सुखरुप बाहेर आलेल्यांनी दिली.

  तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टींना जोरदार तडाखा देत, गुजरातच्या दिशेने पुढे सरकला. हवामान खात्याने चक्रीवादळाचा तीन ते चार दिवसांपूर्वी इशारा दिला होता. मच्छिमार बांधवांनी नौका किनारपट्टीवर उभ्या केल्या होत्या. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान केले. मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना देखील घडल्या. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जहाज समुद्रात उभे करण्यात आले होते. यातील हिरा ऑईल फिल्डमधील बार्ज ‘पी – ३०५’ वरच्या जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील काही जणांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. एक रात्र एक दिवस समुद्राच्या पोटात होतो. भारतील नौसेना आणि कोस्ट गार्डच्या पथकांने त्यानंतर सुखरुप बाहेर काढले.

  आमचे जहाज खूप मोठे होते. चक्रीवादळात ते टिकेल, असे वाटले होते. समुद्रात उंच लाटा उसळत होत्या. जहाजाचे एक एक करुन नांगर यावेळी तुटायला लागले. त्यानंतर ते हेलकावे खाऊन ते बुडू लागले. समुद्राचे उधाण पाहून मनात धडकी भरली होती. पण जीव वाचवणे महत्वाचे होते. त्यामुळे लाईफ जॅकेटसह आम्ही समुद्रात उड्या घेतल्या. दुपारी चार वाजले असावेत. पूर्ण रात्रभर त्यानंतर पाण्याशी संघर्ष केला. अखेर भारतीय नौसेना आणि कोस्ट गार्डने आम्हाला आज बाहेर काढले. देवाच्या कृपेने वाचलो असून हे एक पुनर्जीवन मिळाले असे क्रू मेंबर्सने सांगीतले.

  चक्रीवादळामुळे जहाज कंट्रोलच्या बाहेर गेले. पालघरमध्ये जहाज बुडायला लागले. एकूण १२७ लोक यावेळी जहाजात होतो. तीन दिवस आम्हाला जेवण, पाणी काहीही मिळाल नाही. मदतीसाठी सातत्याने भारतीय नौसेनेच्या संपर्कात होतो. अखेर आज नौसेने आम्हाला बाहेर काढले. सर्वजण सुखरुप आहेत, असे अविनाश ऐडके यांनी सांगितले. कठीण परिस्थितीतून नौसेनेला आम्हाला बाहेर काढले. त्यामुळे त्यांना सलाम असेही ऐडके म्हणाले.

  नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, बार्ज ‘पी ३०५’ शिवाय इतर तीन बार्ज आणि जहाज तेल वादळात अडकले होते. या बार्जमध्ये गाला कन्स्ट्रक्टरवर १३७ क्रू मेंबर्स होते. या सर्वांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. बार्ज एसएस- ३ वर १९६ आणि ऑइल रिंग सागर भूषण १०१ मेंबर्स होते, तेही सुरक्षित आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, नौदल आिण कोस्ट कार्डच्या जहाज आणि हेलिकॉप्टर या कामात दिवसरात्र प्रयत्न करत आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, ओएनजीसी आणि एससीईच्या जहाजांच्या बार्जला खेचून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आहे. अडकलेल्या लोकांपर्यंत खाण्यापिण्याच्या वस्तु पोहचवल्या आहेत. सर्व बार्ज आणि जहाजांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ‘आयएनएस कोच्ची’, ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘आयएनएस तलवार’ही सेवा देत आहे.