सप्टेंबरमध्ये मंदिरं आणि जीमबाबत निर्णय होऊ शकतो : खासदार संजय राऊत

राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. त्यामुळे राज्यातील काही गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. परंतु राज्य अनलॉक (Unlock)  होत असताना इतर गोष्टींवरील निर्बंध हटविले असून प्रार्थनास्थळं (Temple) आणि जीम (Gym ) उघडण्याची मागणी राजकीय स्तरातून जोर धरत आहे. या संदर्भात राज्यातील मंदिरे आणि जीम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी सांगितले आहे.

राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील मंदिरं सुरू न केल्यास एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे.