प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रात पालघर, राजस्थानमध्ये करौली नंतर आता उत्तर प्रदेशात पुजाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे शनिवारी रात्रीला ही घटना घडली असून यामध्ये जमिनीच्या वादातून पुजाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अतुलबाबा उर्फ सम्राट दास असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते गोेंडा येथील राम-जानकी मंदिरात पुजारी होते.

  • उत्तर प्रदेशातील गोंडा गावातील घटना

नवी दिल्ली (New Dehli) : महाराष्ट्रात पालघर, राजस्थानमध्ये करौली नंतर आता उत्तर प्रदेशात पुजाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे शनिवारी रात्रीला ही घटना घडली असून यामध्ये जमिनीच्या वादातून पुजाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अतुलबाबा उर्फ सम्राट दास असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते गोेंडा येथील राम-जानकी मंदिरात पुजारी होते.

मागील दोन वर्षांपासून ते गोंडा गावात राहत होते. हे मंदिर गोंडा येथील इटियाथोक पोलीस ठाणे अंतर्गत तिर्ते मनोरमा भागात आहे. शनिवारला रात्री साधारण २ वाजेच्या सुमारास अतुलबाबा यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चार हल्लेखोरांनी (भूमाफियांनी) मंदिराची जमीन बळकावण्यासाठी पुजारी अतुलबाबा यांची हत्या केली असावी असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तुर्तास आरोपी हल्लेखोर पसार आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. या घटनेने आसपासच्या गावांमध्ये भूमाफियांविरुद्ध जनमत तीव्र झाले आहे. पुजारी अतुलबाबा यांच्या मारेकऱ्यांना त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.