Ten major demands made by MNS after the rape incident in Mumbai; Shalini Thackeray's statement directly to the Home Minister

गेल्या काही दिवसांपासून महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या बहुतेक घटनांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आरोपी म्हणून सापडत आहेत. अशात या आरोपींमध्ये जरब बसावी यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी सरकार कडून सुद्धा जोरदार मागणी न्यायालयातही झाली पाहिजे. जेणेकरून असे कृत्य करण्यापूर्वी आरोपीच्या मनात भीती निर्माण होईल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या बहुतेक घटनांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आरोपी म्हणून सापडत आहेत. अशात या आरोपींमध्ये जरब बसावी यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी सरकार कडून सुद्धा जोरदार मागणी न्यायालयातही झाली पाहिजे. जेणेकरून असे कृत्य करण्यापूर्वी आरोपीच्या मनात भीती निर्माण होईल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे.

    या निवेदनात एकूण दहा मागण्या करण्यात आल्या असून त्यात साकीनाका घटनेतील पिडीतेच्या कुटूंबाला मदत करण्या बरोबरच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    प्रामाणिक मंत्र्याच्या काळात साकीनाका घटनेचा काळीमा

    मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सागितले की सध्याचे गृहमंत्री हे एक जबाबदार, कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक मंत्री म्हणून समाजात ओळखले जातात. त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात साकीनाक्यासारखी घटना घडणे हे निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळेच आम्ही केलेल्या सर्व मागण्यांचा ते पूर्ण विचार करून महिलांवर अत्याचार थांबवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना उचित निर्देश देतील अशी अपेक्षा आहे. शालिनी ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख सांगणाऱ्या राज्याच्या राजधानी मुंबईत साकीनाका येथे ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करत आरोपीने क्रौर्याची परिसीमा गाठली.

    बाहेरून आलेले विकृत लोक राज्याची प्रतिमा खराब करतात

    गेल्या काही दिवसांमध्ये महिला आणि लहान मुलीवर होत असलेले बलात्कार, मारहाण, हत्या, लैंगिक शोषण अश्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. साकीनाका, वसई, अमरावती, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर येथे एकापाठोपाठ एक महिलावर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. सुरक्षित राज्य अशी ओळख असलेले आपले महाराष्ट्र राज्य ही ओळख राज्याच्या बाहेरून आलेले विकृत मानसिकतेची लोक या घटनांसाठी जबाबदार आहेत. दुसरीकडे अशी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचा पोलिसांबद्दलचा धाक नाहीसा झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाच गंभीर्य लक्षात घेऊन आपण तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    मनसेच्या दहा मागण्या

    याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी आपल्याकडे पुढील मागण्या करत आहे’, असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यात साकीनाका बलात्कार घटनेतील आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित महिलेला त्वरित न्याय द्यावा. महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनेत २४ तासांच्या आत महिलेचा जबाब नोंदवून घेणे बंधनकारक करावे. पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्याखाली आरोपीवर गुन्हा दाखल होऊनही कायद्यातील पळवाटा शोधून अनेकजण मुक्त होऊन उजळ माथ्याने फिरताना दिसतात. याला पायबंद घालावा. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आकारास येत असलेला ‘शक्ती कायदा’ हिवाळी अधिवेशनात संमत व्हावा राज्य महिला आयोगाचे पद रिक्त न ठेवता लवकर पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी आमची आग्रही मागणी आहे.

    परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक

    बलात्कारासारख्या घटनात स्त्रीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत असल्याने आरोपीला तत्काळ फासावर चढवण्याचे धारिष्ट्य सरकारने दाखवावे, जेणेकरून लोकांच्या मनात कायमस्वरूपी जरब बसू शकेल. महिला अत्याचारांची वाढती प्रकरणे पाहता आपण स्वतः पुढाकार घेऊन या प्रकरणाचा किमान महिन्यातून एकदा स्वतः आढावा घ्यावा अशी आमची मागणी आहे. चित्रपट सृष्टीत सुद्धा महिला कलाकारांना काम मिळवून देतो असे आमिष दाखवून महिला नवोदित कलाकारांवर अत्याचार करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे,यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. बेकायदेशीर घटनांमध्ये परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आरोपी म्हणून सापडत आहेत. अशात या आरोपींमध्ये जरब बसावी यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना