hsc exam english subject only one question paper for all

ही प्रश्नपेढी https://t.co/Ugilxs०qsF या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन शिकवलेल्या अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांच्या शंका दूर करणे शिक्षकांनाही शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध केली आहे.

    मुंबई:  दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणातून अभ्यासक्रमाचे पुरेसे ज्ञान मिळत नसल्याने प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव आणि माहिती होण्यासाठी प्रश्नपेढी अर्थात Question Bank विकसित केली आहे.

    ही प्रश्नपेढी https://t.co/Ugilxs०qsF या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन शिकवलेल्या अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांच्या शंका दूर करणे शिक्षकांनाही शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध केली आहे.

    पहिल्या टप्यात बारावीच्या आठ आणि दहावीच्या आठ विषयांचे प्रश्नसंच पहिल्या दिवशी उपलब्ध केले आहेत. उर्वरित विषयांचे प्रश्नसंच लवकरच विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न व त्यांच्या प्रकारांचा सराव व माहिती उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

    वेगवेगळे विषय डाऊनलोड केल्याने दोन दिवसात तब्बल ९४ लाख १३ हजार ७६९ हिट संकेतस्थळाला मिळाले आहेत. राज्यभरात दहावीसाठी सुमारे १७ लाख विद्यार्थी बसणार आहेत. तर ही परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या काळात तर बारावीची परीक्षा २३ ते २१ मे या काळात होणार आहे. या परीक्षेला सुमारे १५ लाख विद्यार्थी बसणार आहेत.