Terrorist plot mastermind in Mumbai's Dharavi! Navratra, Diwali, Dussehra where and how to carry out massacre; Training given by Dawood's team

या कटाचा सूत्रधार मुंबईत धारावीत राहणारा जान मोहम्मद शेख याच्यासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऐन नवरात्रीत, दिवाळी, दसर्‍यात कुठे आणि कसे घातपात घडवायचे याचे प्रशिक्षण या टोळीला दाऊद टोळीकडून देण्यात येत होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रांस्त्रांसह स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिस दलातील विशेष शाखेने एकाच वेळी अनेक राज्यांत कारवाई करून पाकप्रशिक्षीत अतिरेक्यांना पकडले आहे.

    मुंबई :  दिल्ली पोलीसांच्या विशेष शाखेने कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह तीन राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्याचा पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी कट उधळून लावला. त्यात मुख्य सूत्रधार मुंबईतून पकडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

    गर्दीच्या स्फोट घडवण्याचा कट

    या कटाचा सूत्रधार मुंबईत धारावीत राहणारा जान मोहम्मद शेख याच्यासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऐन नवरात्रीत, दिवाळी, दसर्‍यात कुठे आणि कसे घातपात घडवायचे याचे प्रशिक्षण या टोळीला दाऊद टोळीकडून देण्यात येत होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रांस्त्रांसह स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिस दलातील विशेष शाखेने एकाच वेळी अनेक राज्यांत कारवाई करून पाकप्रशिक्षीत अतिरेक्यांना पकडले आहे.

    कटाचा सूत्रधार मुंबईच्या धारावीत

    ओसामा, झिशान कमर, मोहम्मद अबू बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद आमिर जावेद आणि मूलचंद लाला अशी या अटक करण्यात आलेल्या पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नावे आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात नवरात्री, रामलीला दरम्यान गर्दीच्या ठिकाणी या दहशतवादी संघटनेचा स्फोट घडवण्याचा कट होता. पाकची पाताळयंत्री गुप्तहेर संघटना आयएसआयने या घातपाताची जबाबदारी अनिस इब्राहीमवर सोपवली होती. मात्र मुंबई पोलीसांच्या नाकाखाली या कारवाया सुरू असताना राज्यातील यंत्रणाना सुगावा लागला नसल्याबाबत शेलार यानी टिका केली आहे.