Terrorist plot mastermind in Mumbai's Dharavi! Navratra, Diwali, Dussehra where and how to carry out massacre; Training given by Dawood's team

राज्याचे एटीएस प्रमुख म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचे नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असे आहे. त्याचे पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास वीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. मात्र दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती केंद्राच्या एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती.

    मुंबई : दिल्ली पोलीसांनी मुंबईतील सूत्रधारासह पाक प्रशिक्षीत दहशतवादांच्या टोळीला जेरबंद केल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र पोलीसांच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह लावले जात आहे. मात्र महाराष्ट्र एटीएस चे प्रमुख विनीत अग्रवाल यानी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे की, पाकिस्तानातील डी कंपनीसोबत जान मोहम्मदचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून असल्याबद्दलचे पुरावे आहेत. राज्यातील पोलीसांचीही त्याच्यावर नजर होतीच. मात्र कोणतीही स्फोटके राज्यात आल्याची आणि दहशतवादी कटाबाबतची माहिती नव्हती.

    दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती

    अग्रवाल यानी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली की, एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडले नाहीत. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे २० वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचे एटीएस प्रमुख म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक मुंबईच्या धारावीतला आहे. त्याचे नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असे आहे. त्याचे पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास वीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. मात्र दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती केंद्राच्या एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती.

    हत्यारे किंवा स्फोटके मिळाली नाहीत

    मुंबई सेंट्रलहून जान शेख एकटा निजामुद्दीमच्या दिशेला रवाना झाला. प्रवासा दरम्यान तो कोटा येथे जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आले. त्याच्याजवळ हत्यारे किंवा स्फोटके मिळाली नाहीत. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. दिल्ली पोलिसांशी माहितीची देवाण घेवाण केल्यानंतर या प्रकरणात कात कारवाई करायचे ते ठरवू  असेही अग्रवाल म्हणाले.