ठाकरे सरकारकडून पुरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर, देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी १५ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या मदतीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने कहर केला असून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु, ही मदत केवळ १५०० कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येत असल्याची टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

    राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी १५ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या मदतीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पुनर्बांधणीचे ३०००कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे ७०००कोटी असे १० हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच दिसून येते, असं फडणवीस म्हणाले.