आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने केंद्राला शिफारस करावी, धनगर आरक्षण कृती समितीचा ठराव

उद्धव ठाकरे सरकारने (State Government) केंद्राक़डे (Central Government) शिफारस करावी, व नरेंद्र मोदी (Narendra Modi)  सरकारने धनगरांसाठी एसटीचे आरक्षण तात्काळ अंमलात आणावे, असा ठराव धनगर आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee)  केला आहे.

मुंबई : एसटी आरक्षण (ST reservation) लागू करावे या मागणीसाठी धनगर समाजाने काल शुक्रवार राज्यभर आंदोलन केलं होतं. तसेच धनगर समाज या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. ढोल बजावो, सरकार जगावो अशा प्रकारचा नारा देत धनगर समाजाने आंदोलन केलं होतं. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे सरकारने (State Government) केंद्राक़डे (Central Government) शिफारस करावी, व नरेंद्र मोदी (Narendra Modi)  सरकारने धनगरांसाठी एसटीचे आरक्षण तात्काळ अंमलात आणावे, असा ठराव धनगर आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee)  केला आहे.

कृती समितीने ( Action Committee) शुक्रवारी माळशिरस येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपयुक्त ठराव पारीत करण्यात आल्याचे कृती समितीचे समन्वयक व युवक कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांनी सांगितले. ठरावाच्या अनुषंगाने येत्या १ ऑक्टोंबर रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलना दरम्यान तहसिलदार, प्रांताधिकारी, व जिल्हाधिकारी यांनी निवेदने देण्यात येतील. असेही या बैठकीत निश्चित केल्याचे काळे म्हणाले आहेत.

कोणत्याही जमातीला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करायचे असेल, तर संबंधित राज्य सरकारने केंद्राला शिफारस करणे गरजेचे आहे. त्यानंतर केंद्र सरकार आरक्षणाबाबत निर्णय घेत असते. त्या अनुषंगाने विद्यमान महाविकास आघाडी सरकारने तातडीने केंद्राकडे शिफारस करावी अशी धनगर समाजाची भावना असल्याचे दादासाहेब काळे म्हणाले.