udhav thackrey

डीच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदावर दावा करणार असल्याच्या चर्चा आणि कॉंग्रेसच्या स्वबळाच्या ना-याची चर्चा हा देखील संदर्भ आहे. त्यामुळेच दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला महत्व आहे. शिवसेनेची भूमिका देखील हिंदुत्व आणि मराठीबाण्याचा पक्ष म्हणून स्वबळावर जाण्याचीअसू शकते हेच त्यांनी या वक्तव्यातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

  मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शेवटी शिवसेना कुणाच्या पालख्या उचलणार नाही आणि कुणाची लाचारी करणार नाही, असे म्हणत हेच आमचे स्वबळ असल्याचे म्हटले आहे. त्यावरून आता त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली भेटीपासून ज्या सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांना पूर्ण विराम देण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
   
  महाविकास आघाडीत संभ्रम तयार करण्याचे काम
  दिल्ली भेटीपासून सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत. त्यामागे मोदींनी एखादा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला असावा असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्याबद्दल अधिकृतपणे भाजप किंवा सेनेच्या कुठल्याही नेत्यानी वक्तव्य केले नाही. तरी भाजप कडून  याबाबत वातावरण निर्मिती करत महाविकास आघाडीत संभ्रम तयार करण्याचे काम केले जात आहे.  त्यातूनच कॉंग्रेस पक्षाच्या नेत्याकडूनही स्वबळाची भाषा सुरू झाली आहे. कारण मध्यावधी निवडणुका राज्यात लागू शकतात असे या नेत्यांच्या वक्तव्यामागचे गणित आहे असे राजकीय जाणकार सांगतात.

  भाजपला जनता जोड्याने हाणेल हा इशारा
  शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सडेतोड भूमिका मांडत शिवसेना कुणाच्याही पालख्या उचलणार नाही हे स्पष्ट करताना  केवळ स्वबळावर एकहाती सत्ता मिळवण्याचे इरादे करणा-या भाजपला जनता जोड्याने हाणल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा दिला आहे. हा इशारा फक्त भाजपालाच नव्हे तर कॉंग्रेसलाही लागू पडतो असे आता बोलले जात आहे.

  वर्धापन दिनी देखील गाव कोरोनामुक्तीचा कार्यक्रम
  शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही असे सांगत उद्धव ठाकरेंनी राजकारण बाजुला ठेवत कोरोनाच्या संकटाच्या आर्थिक बाजूला सावरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. नैसर्गिक आपत्ती संकटात सर्वात आधी धावून जातो तो शिवसैनिक असल्याचे  सांगत केवळ हाणामा-या करणा-यांनी त्यांचे चारित्र्य  काय आणि बदनामी केली तरी पंचावन्न वर्ष शिवसेना कशी वाढत आहे याचा विचार करावा असा सल्ला ठाकरे यांनी दिली.

  तर शिवसेना टिकलीच नसती
  नारायण राणे यांचा उल्लेख न करताही त्यांनी “तू कोण आहेस, स्वत:चा चेहरा पाहिलाय का? आम्ही आमच्या रुबाबत चाललोय. जर शिवसेनेचं राजकारण हीन दर्जाचे असते, तर शिवसेना टिकली नसती. राजकारण बाजूला ठेवा, आपल्या वर्धापन दिनी कार्यक्रम देतोय, गाव कोरोनामुक्त करा, असा कोणता पक्ष आहे का वर्धापन दिनी राजकारण बाजूला ठेवा असे सांगतो’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, आम्ही स्वाभिमानाने चालू, आमच्या ताकदीवर चालू’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुखांच्या ह्या वक्तव्याला मोदी यांच्या दिल्ली भेटीनंतरच्या सेना-भाजप युती होणार असल्याच्या चर्चाची पार्श्वभुमी आहे.

  अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा
  दुसरीकडे अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदावर दावा करणार असल्याच्या चर्चा आणि कॉंग्रेसच्या स्वबळाच्या ना-याची चर्चा हा देखील संदर्भ आहे. त्यामुळेच दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला महत्व आहे. शिवसेनेची भूमिका देखील हिंदुत्व आणि मराठीबाण्याचा पक्ष म्हणून स्वबळावर जाण्याचीअसू शकते हेच त्यांनी या वक्तव्यातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

  असा आहे सोलापूर दौरा
  दरम्यान २८ जून रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर, २९ जुलै रोजी माळशिरस, माढा, कुर्डुवाडीला भेट देऊन जनजागृती, ३० जून रोजी बार्शी, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण दौरा आणि सभा,१ जुलै रोजी अक्कलकोट दौरा, २ जुलै रोजी बाईक रॅली काढून मोर्चाची तयारी करण्यात येईल असा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला.