केवळ २४ दिवसांमध्ये ठाण्यात कोरोना रुग्णालयाची झाली उभारणी- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या १०००

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या १००० खाटांचे कोरोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. ठाणे कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अवघ्या २४ दिवसांमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. बाळकुम-साकेत येथे १०२४ बेड्सचे तळ अधिक १० मजल्यांचे हे रुग्णालय आहे. आयसीयु बेड, डायलिसीस, प्रयोगशाळा, सीटस्कॅन, एक्सरे आदी सर्व सुविधा याठिकाणी करण्यात आल्या आहेत. या कामासाठी एमएमआरडीएसह १९ विकासकांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी येथे अशा प्रकारे रुग्णालये उभारणीचे काम सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या हॉस्पीटलमुळे ठाणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. त्यातील ५०० बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. यातील ७६ बेड्स हे आयसीयूचे असून १० बेड्स डायलिसीस रूग्णांसाठी तर १० बेड्स ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेड्स निर्माण करता येऊ शकतात, असेही शिंदे यांनी सांगितले.