ठाणे- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, भातसा धरण भरले, नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा

शहापूर तालुक्यातील भातसा धरण शनिवारी ९९ टक्के भरले असून, धरणाचे पाच दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. या धरणातून ठाणे – मुंबई सारख्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

    मुंबई : शहापूर तालुक्यातील भातसा धरण शनिवारी ९९ टक्के भरले असून, धरणाचे पाच दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. या धरणातून ठाणे – मुंबई सारख्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

    दरम्यान त्यामुळे आता यावर्षी पाणी टंचाई जाणवणार नाही. ठाणे – मुंबई करांना पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यांतील भातसा धरण हे शनिवार दि .११ सप्टेंबर रोजी ९९ टक्के भरले असल्याने धरणाचे पाच दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आले असल्याची माहिती येथील कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी दिली.

    धरणाची पाणी पातळी १४१.७० मीटर तर पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर एवढी आहे. यापैकि ९३३.२९३ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच एकुण पाणी साठा ९६७.२९३ दलघमी ऐवढा आहे. धरण पूर्ण संचय साठा ९७६.१० असा असुन सद्यस्थितीत ९९.६० टक्के येवढे धरण भरले आहे. भातसा क्षेत्रात ४१.०० मीमी येवढा काल पाऊस झाला आहे. एकुण पाऊस २३१८ .०० मिमी असुन मागील वर्षी २५२०.०० मिमी येवढा पाऊस भातसा धरण क्षेत्रात झाला.