Thane to Borivali the largest tunnel in the country; It will open in March 2022

  मुंबई : देशातील रस्त्यावरील सर्वात जास्त लांबीचा बोगदा बांधण्याचे काम मुंबईच्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून ठाणेपर्यंत सुरू झाले आहे. राज्याचे नगरविकास आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी याबाबत माहिती दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा प्रकल्प १०.२२ किमीचा बोगदा आणि १.५५चा जंक्शन साकारला जात आहे. यासाठी अंदाजित खर्च ११२३५ कोटी रूपये अपेक्षीत आहे. भुसंपादन आणि त्यानंतरच्या सर्व परवानग्यांचे काम पुर्ण झाल्यानंतर सहासष्ट महिन्यांनी हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षीत आहे असे शिंदे म्हणाले.

  त्यांनी सांगितले की, या सहा पदरी बोगद्यात वाहनांची वेग मर्यादा ८० किमी प्रति तास असेल. त्यामुळे मुंबईच्या बोरीवली येथून ठाणे येथे केवळ १५ मिनीटांत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

  पहिलाच दोन जिल्ह्यांना बोगद्याने जोडणार प्रकल्प

  या प्रकल्पाबाबत महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सांगितले की, हा राज्यातील पहिलाच दोन जिल्ह्यांना बोगद्याने जोडणार प्रकल्प असेल. त्याकरीता १६.५४ हेक्टर खाजगी तर ४०.४६ हेक्टर सरकारी जमीन भुसंपादन केले जात आहे. बोरीवली येथून ठाण्यातील टिकूजीनीवाडी जंक्शन पर्यंत असा हा बोगदा असेल. या अंतरासाठी सध्या २५ किमीचा वळसा घालून जावे लागते.

  जैव विवीधतेला धक्का लागणार नाही

  या अभिनव प्रकल्पांची वैशिष्ट्ये सांगताना प्रदेश प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सांगितले की, या बोगद्यात प्रत्येक ३०० मीटर्सवर वायुविजनाची जगा असेल, त्यात सांडपाणी व्यवस्थापन, धुर शोधक यंत्रणा, आणि हवा शुध्द आणि स्वच्छ ठेवणारी यंत्रणा यांचा समावेश असेल. हा व्टिन टनेल संजय गांधी राष्ट्रीय उद्याना खालून जाईल जेणेकरून या भागातील जैव विवीधतेला धक्का लागणार नाही.

  मेट्रो प्रकल्पातील भुयारी मार्ग तंत्राचा वापर

  सध्या या राष्ट्रीय उद्यानात अनेक नैसर्गिक प्रजातीचे वृक्ष तसेच बिबट, ठिपक्यांचे हरिण, सांबर, काळवीट, विवीध प्रजातीचे माकडे, कोल्हा, हायना, साप, पक्षी, मगरींचा अधिवास आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पात भुयारी मार्ग तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्राचा वापर हा बोगदा करण्यासाठी केले जाणार आहे.