“तो दिवस लांब नाही”…शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील, निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा

दादर मध्ये सेना भवन आहे. दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. संज्या गुंडगिरीच्या वार्ता करतो ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. लुक्का आहे एक नंबरचा, अशी खोचक टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली आहे.

  मुंबई : भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. यावरून शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला होता. तर राजकीय पटलावर देखील भाजप आणि सेना नेत्यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे.

  दरम्यान यावरून आता निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. दादर मध्ये सेना भवन आहे. दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. संज्या गुंडगिरीच्या वार्ता करतो ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. लुक्का आहे एक नंबरचा, अशी खोचक टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली आहे.

  राऊत काय म्हणाले होते ?

  होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय आम्ही गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.

  नितेश राणेंची टीका

  दरम्यान, जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना तुमचे उद्धव ठाकरे आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आले आहेत. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली होती. त्यानंतर आता भाजप विरूद्ध शिवसेना असा वाद रंगताना दिसत आहे.