अशी कोरोनाने थट्टा आज मांडली : आभासी शिक्षणाच्या नावाखाली फी ची मोठ्या प्रमाणात शाळांकडून होतेय लूट; प्राइम स्कूल व्यस्थापनाला राष्ट्रवादीने घेतले फैलावर; प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचाही दिला इशारा

याविरोधात पालकांच्या सोबतीने ॲड. अमोल मातेले यांनी प्राइम शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.परंतु, शाळेच्या वरिष्ठ संचालकांना कोरोना झाला आहे. वरिष्ठ स्तरावर फी वाढीचे,वसुली चे निर्णय घेतले जातात अशी उडवाउडवीची आणि पळ काढणारी उत्तरे प्राइम स्कूलकडून देण्यात आली.

    मुंबई : मरोळमधील आईसीएसई बोर्डाच्या प्राइम स्कूल अकॅडमीच्या आभासी फी लुटीविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली पालक एकवटले. ॲड. मातेले यांनी शाळेच्या मुख्य व्यवस्थापनाला आभासी शिक्षणाच्या नावाखाली Annual डे, कंप्युटर अशी फी वसुली सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षण घेतले नसले तरी ही फी वसुली आणि शिक्षणाचा धंदा खासगी शाळांच्या संस्था चालकांनी मांडला आहे.

    याविरोधात पालकांच्या सोबतीने ॲड. अमोल मातेले यांनी प्राइम शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.परंतु, शाळेच्या वरिष्ठ संचालकांना कोरोना झाला आहे. वरिष्ठ स्तरावर फी वाढीचे,वसुली चे निर्णय घेतले जातात अशी उडवाउडवीची आणि पळ काढणारी उत्तरे प्राइम स्कूलकडून देण्यात आली.

    विशेष म्हणजे अमोल मातेले आणि पालक ज्यावेळी शाळेच्या जबाबदार व्यक्तीला फीवसुलीच्या नावाखाली लूटमारीचा जाब विचारत होते त्यावेळी फक्त पळपुटेपणा करणारी उत्तरे दिली जात होती.

    खासगी स्कूलच्या या बेकायदा, हम करे सो कायदा फीवसुली विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली आहे. या प्रश्नांवर त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत त्यांना खासगी शाळांच्या लुटीवर अनेक बाबी उघड केल्या होत्या.

    वर्षा गायकवाड या प्रश्नी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वास त्यांनी दिले होते. आता ॲड. अमोल मातेले यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कोरोना काळात आर्थिक दृष्टीने संकटात सापडलेल्या पालकांसाठी आवाज आणखी बुलंद करण्याचे प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचे ठरवले आहे.