विमानतळ मुख्यालय मुंबईत राहणार असून मुंबईच्या गौरवासह विकास आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार : अदानी समुहाचे व्टिट!

अदानी समूहाच्या व्टिटर हँडलवरून सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास व्टिट करण्यात आले आहे की, ‘अश्या अफवा पसरविल्या जात आहेत की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबाद येथे हलविण्यात आले आहे, आम्ही याबाबत ठामपणे अश्वस्त करू इच्छितो की..

    मुंबई.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी अदानी यांच्या कंपनीने काम सुरू करताच मुख्यालय अहमदाबादला हलवले असल्याच्या बातम्या झळकल्या. त्यानंतर त्यावर शिवसेनेसह मनसे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी तिव्र प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली होती मात्र या सा-या आक्रमक प्रतिक्रिया नंतर अदानी समूहाच्या वतीने व्टिट करत विमानतळ मुख्यालय मुंबईत राहणार असून मुंबईत जास्तीत जास्त विकास आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे.

     

    दोन्ही विमानतळांचे मुख्यालय मुंबईतच

    अदानी समूहाच्या व्टिटर हँडलवरून सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास व्टिट करण्यात आले आहे की, ‘अश्या अफवा पसरविल्या जात आहेत की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबाद येथे हलविण्यात आले आहे, आम्ही याबाबत ठामपणे अश्वस्त करू इच्छितो की, मुंबई आणि नवी मुंबई दोन्ही विमानतळांचे मुख्यालय मुंबईतच असेल आम्ही  आमच्या बांधिलकीबाबत पुन्हा सांगू इच्छितो की, मुंबईचा गौरव वाडेल आणि येथे हजारो नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करण्याचे काम आमच्या विमानतळ संचलनाच्या काळात केले जाईल’  त्यामुळे राजकीय नेत्यांच्या दिवसभरात केलेल्या राणा भिमदेवी गर्जना बाजुला पडल्याचे मानले जात आहे.