विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा, ह्या सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता

निलम गोऱ्हेंचे उपसभापती पदाची मुदत संपली आहे. त्यामुळे हे पद रिक्त आहे. या पदासाठी पुन्हा निवडणूक होणा आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाने मागील ५ महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रज्यातील विधिमंडळाचे कामकाज ठप्प होते. आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सभापती निंबाळकर यांनी उपसभापतीदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक उद्या मंगळवारी होणार आहे.

निलम गोऱ्हेंचे उपसभापती पदाची मुदत संपली आहे. त्यामुळे हे पद रिक्त आहे. या पदासाठी पुन्हा निवडणूक होणा आहे. सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी आणि अपक्ष यांची आमदार संख्या जास्त असल्याने पुन्हा निलम गोऱ्हे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेचा पावसाळी अधिवेशनचा आज पहिला दिवस वादळी ठरला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील गदारोळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. अखेर ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर होताच विरोधकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला.