अपोलो कॅन्सर सेंटरद्वारे स्तनाच्या कर्करोगा संबंधित जागरूकता अभियान सुरू करण्यात आले आहे : द बेस्ट एक्झामिनर फ़ॉर यु इज यु

भारतात प्रत्येक 4 मिनिटांमागे 1 महिलेला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान होताना दिसून आले आहे आणि दर 13 मिनिटांमध्ये किमान 1 महिला ही स्तनाच्या कर्करोगास बळी पाडते. भारतातील महिलांचे या आजाराचे निदान हे उशीरा होते, अधिक ॲडवान्स्ड स्टेजमध्ये आजार पोहोचल्यानंतर आणि त्याची अवस्था देखील फ़ार चांगली नसते. 29 पैकी साधारण 1 महिलेला आपल्या आयुष्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो. प्रत्येक महिलेने जर आपली स्वत:ची तपासणी नियमितपणे केली, तर लाखो महिलांचे प्राण वाचविण्याकरिता आपण एकतरी चांगले पाऊल उचलले असेल असे म्हणायला हरकत नाही.

    मुंबई : अपोलो कॅन्सर सेंटर (एसीसी) द्वारे स्तनाच्या कर्करोगा संबंधित जागरूकता अभियान सुरू करण्यात आले आहे – द बेस्ट एक्झामिनर फ़ॉर यु इज यु (आपल्याकरता सर्वोत्तम स्तन तपासणी चिकित्सक आपण स्वत:च असतो) या अभियानाच्या माध्यमाने ऑक्टोबर महिना हा स्तनाच्या कर्क रोगाप्रती जागरूकता महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. अपोलो कॅन्सर सेंटरद्वारे राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचे महत्वं म्हणजे आपण स्वत: आपल्या स्तनाची नियमित तपासणी करण्याचे समजून घेणे. ही मोहिम अपोलो कॅन्सर सेंटरद्वारे प्रत्येक महिलेस स्वत:च्या स्तनाची तपासणी कशी करावी आणि इतरांना देखील त्याकरता कसे प्रोत्साहित करावे याकरिता हाती घेतली गेली आहे.

    भारतात प्रत्येक 4 मिनिटांमागे 1 महिलेला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान होताना दिसून आले आहे आणि दर 13 मिनिटांमध्ये किमान 1 महिला ही स्तनाच्या कर्करोगास बळी पाडते. भारतातील महिलांचे या आजाराचे निदान हे उशीरा होते, अधिक ॲडवान्स्ड स्टेजमध्ये आजार पोहोचल्यानंतर आणि त्याची अवस्था देखील फ़ार चांगली नसते. 29 पैकी साधारण 1 महिलेला आपल्या आयुष्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो. प्रत्येक महिलेने जर आपली स्वत:ची तपासणी नियमितपणे केली, तर लाखो महिलांचे प्राण वाचविण्याकरिता आपण एकतरी चांगले पाऊल उचलले असेल असे म्हणायला हरकत नाही.

    या मोहिमे अंतर्गत अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याकरता, अपोलो इन्टिग्रेटेड ब्रेस्ट क्लिनिक ची सुरवात करण्यात आली- ज्याचे उद्घाटन हे प्रसिद्ध गायिका आणि कवियत्री नेहा भसीन यांच्याद्वारे करण्यात आले. हे असे एक चिकित्सालय आहे जिथे एखाद्याला एका दिवसामध्ये निदान आणि रिपोर्टसह आपल्या समस्येचे मूल्यांकन करून मिळेल. कर्करोगाशी यशस्वीपद्धतीने लढत त्यावर मात करणाऱ्या रूग्णांचा स्तकारासह, एका चर्चात्मक सत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते, ज्याचा विषय हा “ इम्पॉर्टन्स ऑफ़ सेल्फ़-ब्रेस्ट एक्झामिनेशन ॲन्ड अर्ली डायग्नोसिस ऑफ़ ब्रेस्ट कॅन्सर” (स्वत:च्या स्तनाची तपासणी करण्याचे महत्व आणि स्तनाच्या कर्करोगाचे लवकर करता येऊ शकणारे निदान) असा होता.

    भारतासह जगभरातील महिलांकरता लवकर निदान होण्याचे आणि नियमित तपासण्यांचे महत्वं हे अपोलो कॅन्सर सेंटरला नक्कीच माहिती आहे. स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्युचा धोका हा 90% ने कमी होऊ शकतो. महिलांना apollocancercentres.com, येथे भेट देऊन स्वत: आपल्या स्तनाची तपासणी कशी करावी या बद्दल अधिक माहिती मिळू शकते. या संकेत स्थळावर व्हिडियो, इन्टरॅक्टिव इमेज आणि माहिती दिली गेली आहे ज्यामुळे एखाद्या महिलेला स्वत:ची तपासणी करता येऊ शकेल.

    आज कर्करोग म्हणजे 360 अंशांची व्यापक अशी काळजी, ज्यामध्ये बांधिलकी, कौशल्य आणि तज्ञांच्या दुर्दम्य अशा जिद्दीचा समावेश होतो. यामध्ये सातत्याने नवनवी शोध आणि नवीन विचार करण्याची मागणी असते. अपोलो कॅन्सर सेंटरचे संकेतस्थळ त्याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. कर्करोगाची काळजी आणि माहिती ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी, याकरता अपोलो कॅन्सर सेंटरने भारतातील पहिले आणि व्यापक अशी देवाणघेवाण करता येऊ शकणारे संकेतस्थळ सुरू केले आहे: www.apollocancercentres.com हे संकेतस्थळ पहिले आणि परिपूर्ण असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला भारतातील कर्करोगाचे उपचार आणि काळजी याबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकेल.

    संकेतस्थळाची रचना ही कर्करोगाची लक्षणे, धोके, निदान आणि उपचाराचे पर्याय अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने समजू शकतील हे लक्षात घेऊन केली गेली आहे, आणि म्हणून यावर लेखी आणि ऑडियो-व्हिज्युअल पद्धतीचा मार्गांचा अवलंब केला गेला आहे आणि 100 पेक्षा कधी कर्करोगाच्या प्रकारांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या संकेतस्थळाचा वापर करणाऱ्यांना भारतातील सर्वोत्तम अशा 14 कर्करोगांची आणि 240 ऑन्कोलॉजिस्टची माहिती मिळू शकेल.

    या संकेतस्थळामुळे कर्करोगाकरिता असलेल्या आत्याधुनिक अशा उपचारांची माहिती तर मिळेलच पण कर्करोगानंतरचे आयुष्य, रूग्णांना, काळजी घेणाऱ्यांना आणि कर्करोगातून बचावलेल्या व्यक्तींना लागणाऱ्या सहकार्य संबंधित देखील संपूर्ण माहिती त्यावर असेल. हे संकेतस्थळ म्हणजे रूग्णांना आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तींना लागणाऱ्या संपूर्ण माहितीची गुरूकिल्लीच असणार आहे.

    यावेळेला बोलताना, अपोलो हॉस्पिटल्सचे सीओओ आणि विभाग प्रमुख, संतोष मराठे म्हणाले, “ कर्करोगाच्या काळाजीप्रती अपोलो नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आम्हाला ही संधी फ़क्त स्तनाच्या कर्करोगाप्रती जागरूकता निर्माण करण्याकरताच वापरायची नव्हती तर कर्करोगाबद्दलची माहिती सगळ्यांना मिळावी याकरता देखील वापरायची होती.

    एसीसीचे संकेतस्थळ हे डिजिटल व्हिडियो लायब्ररीच्या माध्यमाने अधिक देवाण घेवाण करणारे आणि रूग्ण आणि त्यांच्या काळजी घेणाऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता तसेच कर्करोगाच्या नवनवीन निदाना संबंधी, त्याच्या रिकरन्स आणि शरीराच्या इतर भागांवर होणाऱ्या मेटास्टॅसिस संबंधीत माहिती देणारे असणार आहे.”

    यावेळेला बोलताना, अपोलो कॅन्सर सेंटर्सचे ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टिक सर्जरी , चिकित्सक डॉ. संदिप बिप्ते म्हणाले, “ स्तनाच्या कर्करोगावर यशस्वी पद्धतीने मात करणाऱ्यांची संख्या ही कमी असणे हे फ़ार दौर्दैवी आहे आणि यामागचे महत्वाचे कारण म्हणजे या आजाराचे उशीरा होणारे किंवा तीव्र अशा स्तरावर पोहोचल्यानंतरच होणारे निदान. यामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी करायची असेल तर महिलांमध्ये स्वत: स्तनाची तपासणी करण्याप्रती जागरूकता निर्माण करून त्याबद्दलचे शिक्षण देणे फ़ार महत्वाचे ठरेल. स्तनाचा कर्करोग हा एक बरा होऊ शकणार आजार आहे आणि योग्य वेळेला लक्षात आल्यास आयुष्य वाचण्याची शक्यता देखील यात अधिक आहे. आणि हे करायचे असेल तर त्याकरता एकच मार्ग आहे तो म्हणजे त्याची लक्षणे जाणून घेऊन, योग्य वेळेला त्याचे निदान कसे करता येऊ शकेल या बद्दलची अचूक आणि योग्य अशी माहिती आत्मसाद करणे.”

    याविषयावरील आपले विचार मांडताना, प्रसिद्ध गायिका आणि कवयत्री नेहा भसीन म्हणाल्या, “ कर्करोगामुळे असंख्य महिलांना त्रास होत असताना, मला स्तनाच्या कर्करोगाप्रती जागरूकता निर्माण करणाऱ्या या अपोलो कॅन्सर सेंटरच्या अभियानात सामील होण्यास अतीशय आनंद होतो आहे.

    जगात महिला विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना, या आजारामुळे भारतातच नव्हे तर जगभरात महिलांच्या मार्गक्रमणात अडथळे निर्माण होतान दिसून येतात. त्यामुळे आज आपण एक प्रतिज्ञा करू या, स्वत:ला आणि आपल्या आजूबाजूला असलेल्यांना स्तनाच्या कर्करोगाची माहिती द्यायची आणि स्वत: स्वताची तपासणी करण्याचे महत्व पटवून देण्याची. एक लहानसे पाऊल पण योग्य दिशेने हे असंख्य व्यक्तींचा जीव वाचविण्याचे कार्य करू शकेल.”