राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित

रुपाली चाकणकर यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मंजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राष्ट्रवादीतून विद्या चव्हाण, आणि रुपाली चाकणकर यांच्या दोघींच्या नावांची या पदा साठी चर्चा होती. फडणवीस सरकारच्या काळातील महामंडळ आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या आघाडी सरकारने रद्द केल्या होत्या. त्यावेळेपासून महिला आयोगाच्या अध्यक्षांचे पदही रिक्त होते.

    मुंबई: साकीनाका निर्भयाप्रकरणानंतर देशभरात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्यानंतर जाग आलेल्या महाविकास आघाडी सरकारवर दीड वर्षापासून रिक्त असलेले महिला आयोगाच्या अध्यक्षपद भरण्यासाठी दबाव होता. अखेर महाविकास आघाडी सरकारने  चौफेर टिका झाल्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

    महिलांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे छाप

    याबाबत लवकरच शासन निर्णय जारी केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे छाप उमटवली होती. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली.