एशियाटिक ग्रंथालयाला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा द्यावा; मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे केंद्राला पत्र

मुंबईतील द एशियाटीक ग्रंथालयाची स्थापना १८०४ मध्ये झाली. ग्रंथालयात संशोधन तसेच उच्च शिक्षणासाठी दुर्मिळ ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ कोलकाताप्रमाणे या संस्थेलाही महत्वाची राष्ट्रीय संस्था म्हणून दर्जा देण्याची मागणी मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही केली आहे.

    मुंबई : मुंबईतील द एशियाटिक ग्रंथालयास राष्ट्रीय संस्थेचा दर्जा द्यावा, अशी मागणी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

    शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचीही मागणी

    मुंबईतील द एशियाटीक ग्रंथालयाची स्थापना १८०४ मध्ये झाली. ग्रंथालयात संशोधन तसेच उच्च शिक्षणासाठी दुर्मिळ ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ कोलकाताप्रमाणे या संस्थेलाही महत्वाची राष्ट्रीय संस्था म्हणून दर्जा देण्याची मागणी मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही केली आहे. त्यानुसार केंद्राच्या सांस्कृतिक विभागाने याबाबतची योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करणारे पत्र मराठी भाषा मंत्री देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह यांना पाठविले आहे.