देशातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे अर्थव्यवस्था व बेरोजगारी : सुप्रिया सुळे

सध्या देशातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे अर्थव्यवस्था व बेरोजगारी आहे.त्यामुळे पहिल्याच दिवशी मला असे वाटते की संसदेत आपण काय चर्चा केली पाहिजे ते म्हणजे अर्थव्यवस्थेची स्थिती, महामारी आणि बेरोजगारीची आव्हाने याबाबत चर्चा झाली पाहिजे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मुंबई : संसदेचे पावसाळी अधिवेशनाला (monsoon session) आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय अधिवेशनाचे कामकाज रोज चार तास होणार आहे. अधिवेशनात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देशासमोर असलेल्या आव्हान ( biggest challenge ) , अर्थव्यवस्था (economy) आणि बरोजगारी (unemployment ) याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे लोकसभा अधिवेशनात म्हणाल्या की, सध्या देशातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे अर्थव्यवस्था व बेरोजगारी आहे.त्यामुळे पहिल्याच दिवशी मला असे वाटते की संसदेत आपण काय चर्चा केली पाहिजे ते म्हणजे अर्थव्यवस्थेची स्थिती, महामारी आणि बेरोजगारीची आव्हाने याबाबत चर्चा झाली पाहिजे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.


कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली पाहिजे आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. देशात अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे येणाऱ्या तरुणांना तसेच बेरोजगारांना रोजगाराची योजना तयार करायला हवी. याबाबत संसदेत चर्चा व्हायला हवी.