“ये अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं,” भाजपा आमदाराचा मोठा दावा

‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, असं सूचक वक्तव्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. नितेश राणे यांनी यावेळी कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विरोध नाहीच असा दावाही केला. शेती आणि शिवसेनेचा (SHIVSENA) काही संबंध नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली.

मुंबई : राज्यसभेत कृषी विधेयक सादर होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  राज्यसभेत (Rajya Sabha) चर्चेसाठी अनुउपस्थित होते. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये (State Government) एक महत्त्वाचा घटक कक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) कृषी विधेयकावर घेतलेल्या भूमिकेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोला लगावल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील शरद पवार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, असं सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. नितेश राणे यांनी यावेळी कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाहीच असा दावाही केला. शेती आणि शिवसेनेचा काही संबंध नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली.

काय म्हणाले नितेश राणे ?

नितेश राणे यांनी म्हटलं की, “राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कृषी विधेयकावर मत मांडलं पण विरोध केला नाही. त्यांनी फक्त सभात्या केला. ‘ये अंदर की बात है’ अशी एक घोषणा आहे त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’ इतकंच मी तुम्हाला सांगू शकतो”.

कृषी विधेयकावरील भाषणं ऐकली तर संजय राऊत यांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं असल्याचं लक्षात येईल. शिवसेनेला नेमकं कुठे जायचं आहे हेच माहिती नाही. शेती कुठे आणि कशी करायची हेदेखील त्यांच्या नेतृत्वाला माहिती नसून शेतीवर कधीही भूमिका घेत नाहीत अशी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच नितेश राणे यांनी संभ्रमात टाकणारं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.