The bodies of 49 people were found in the sea 600 crew members safe Naval rescue operation begins

चक्रीवादळात अडकलेल्या ‘पी ३०५ बार्ज’वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत १८८ कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. युद्धनौका ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘ आयएनएस व्यास’ने काही मृतदेह मुंबई बंदरावर आणले. आतापर्यंत ४९ कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक बलाने मुंबई समुद्रक्रिनाऱ्याहून चार जहाजांमधील ६०० हून अधिक जणांना वाचवले आहे.

  मुंबई : चक्रीवादळात अडकलेल्या ‘पी ३०५ बार्ज’वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत १८८ कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. युद्धनौका ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘ आयएनएस व्यास’ने काही मृतदेह मुंबई बंदरावर आणले. आतापर्यंत ४९ कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक बलाने मुंबई समुद्रक्रिनाऱ्याहून चार जहाजांमधील ६०० हून अधिक जणांना वाचवले आहे.

  केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या परिसरात सुरु असलेल्या बचावकार्याचे कौतुक केले आहे. नौदलाचे पश्चिम कमानचे प्रवक्त्यांनी सांगितले की, मुंबईपासून ३५ कि.मी. दूर समुद्रात बार्ज ‘पी ३०५’च्या १८६ क्रू मेबर्स आणि तक बाराप्रदाच्या दोन क्रू मेंबर्सला वाचवले आहे. अद्यापही २६ जण बेपत्ता आहेत आणि त्यांच्या जीवंत राहण्याची अशा फारच कमी आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. नौदलाचे जहाज आणि हॅलिकॉप्टर दिवसरात्र त्यांच्या शोधात आणि बचावकार्यात काम करत आहे. अद्यापही समुद्र उसाळी मारत असून हवामान ठिक नाही.

  शोध मोहीम जारी

  आयएनएस कोच्ची, कोलकात्ता, व्यास, बेतवा, तेग, विमान पी ८१, चेतक आणि सीलिंग हॅलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. आयएनएस तलवारलाही मदत आणि बचायकार्य करण्यासाठी वळवण्यात आले आहे.

  ‘तलवार’ने ३०० जणांना केली मदत

  गुजरात समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या आयएनएस तलवारने सपोर्ट स्टेशन ३ आणि ड्रिल शिप सागर भूषणची मदत केली होती. त्यांना आता ओएनजीसी सपोर्ट वेसलद्वारे सुरक्षित मुंबईत आणण्यात आले आहे. या जहाजावर सुमारे ३०० चालक दल सदस्यांना भोजन आणि पाणी देखील मुंबईहून नौदलाच्या हॅलिकॉप्टरद्वारे पुरवण्यात आले आहे.

  ११ मृतदेहांची ओळख पटली

  अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवरून गेले. चार दिवसांपूर्वी या वादळामुळे समुद्रापासून काही अंतरावर असलेली ‘पी ३०५’ बार्ज बुडाली. या बार्जवरील १८६ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर अद्यापही काही बेपत्ता आहेत. आयएनएस कोच्चीच्या माध्यमातून आणलेल्या २२ पैकी ११ मृतदेहांची ओळख येलो गेट पोलिसांनी पटवली आहे. त्यापैकी विशाल घाटघरे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. एस्कॉन कंपनीकडून माहिती मिळण्यास उशीर होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.

  दुर्घटनेला कॅप्टन जबाबदार- कर्मचारी

  बार्ज पी ३०५ वर २७० कर्मचारी काम करत होते. यातील सुमारे ६० ते ७० जण बेपत्ता असल्याची माहिती बार्जवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. वादळाची सूचना बार्जच्या कॅप्टन प्रताप यांना मिळाली होती. मात्र, कॅप्टन प्रतापचा निष्काळजीपणा हा अनेक मृत्यूला कारणीभूत ठरला आहे, अशी माहिती बार्जवर काम करणाऱ्या अभिषेक आव्हाड आणि विशाल केदार या दोघांनी दिली. वादळ येण्यापूर्वी बार्ज पी ३०५ च्या कॅप्टनला सूचना करण्यात आली होती. त्यांना मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासही सांगण्यात आले होते. मात्र, या सूचनांचे पालन कॅप्टनकडून झाले नाही आणि मोठा अनर्थ झाला. या बार्जवर काम करणारे तब्बल २७० जण मृत्यूच्या दाढेत अडकले होते. यातील अनेकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.