The bride went to the wedding alone

    मुंबई :  लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. मात्र, मुंबईतील एका नवरी मुलीला आलेला अनुभव डोळ्यात पाणी आणणारा असाच आहे. शुक्रवारी मुलीची हळद झाली आणि शनिवारी मेहंदीचा कार्यक्रम हाेता मध्यरात्री अचानक आभाळ काेसळल्याचा आवाज आला आणि घर पूर्ण उध्दवस्त झाले.

    मोठी मुलगी, जावई व तिचे लहान मुुलं दरडी खाली आले. लहान बाळाला मुलीने पाेटाखाली धरलं हाेतं सुदैवाने सर्व वाचले, लग्नासाठी आलेले इतर नातेवाईकांना दरडीखालून सुखरुप बाहेर काढले.

    आम्ही सर्व वाचलाे असे लता घशिंग सांगत हाेत्या. मुलीचं आज लग्न हाेतं तिला नातेवाईकांबराेबर पाठवले? संसार माेडला हे उघड्यावर टाकून कुठे जाणार?पाेरीच्या लग्नाला कसं जाणार? ही खंत नातेवाईक व्यक्त करत हाेते.