मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कांदिवलीतील एकाच बिल्डिंगमध्ये इतके कोरोना रुगण सापडले की… BMC ने केली मोठी कारवाई

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मुंबईत सध्या दररोज ३० ते ४० हजार कोरोना चाचण्या होत असल्या तरी कोरोनाचे रुग्ण मात्र ३०० च्या आत सापडत आहेत. कांदिवली पश्चिमेतील वीणासंगीत सोसायटीत गेल्या महिन्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर मुंबई महापालिकेने तिथे शिबीर घेतले आणि तिथे रुग्ण सापडू लागले. गेल्या महिनाभरात या सोसायटीत एकूण १४ रुग्ण सापडले असून ही इमारत सील करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आल्याने रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत झपाटयाने घट होत आहे. परंतु कांदिवलीतील वीणासंगीत सोसायटीत कोरोना बाधित ६ रुग्ण आढळल्याने इमारत सील करण्यात आली आहे. दरम्यान, या सोसायटीत महिनाभरात १४ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोसायटी सील करून सर्व रुग्ण हे होम क्वारेंटाईन आहेत,अशी माहिती कांदिवलीच्या आर-दक्षिणच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली.

    कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मुंबईत सध्या दररोज ३० ते ४० हजार कोरोना चाचण्या होत असल्या तरी कोरोनाचे रुग्ण मात्र ३०० च्या आत सापडत आहेत. कांदिवली पश्चिमेतील वीणासंगीत सोसायटीत गेल्या महिन्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर मुंबई महापालिकेने तिथे शिबीर घेतले आणि तिथे रुग्ण सापडू लागले. गेल्या महिनाभरात या सोसायटीत एकूण १४ रुग्ण सापडले असून ही इमारत सील करण्यात आली आहे.

    मात्र, सध्या या इमारतीत कोरोनाचे केवळ ६ सक्रिय रुग्ण आहेत. तर ८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे त्यांना घरीच क्वारेंटाईन करण्यात आले आहे.

    मुंबई महापालिका खबरदारीचा उपाय म्हणून वीणासंगीत सोसायटीत गेल्या महिनाभरापासून शिबिर घेत असून या शिबिराच्या माध्यमातून १४ रुग्ण सापडले आहे. मात्र, त्यातील ८ जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

    या आठवडाभरात इमारतीत एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. शिवाय या सर्व रुग्णांचे डेल्टासाठी नमुने पा़ठवले होते. मात्र, आतापर्यंत या सोसायटीत डेल्टाचा एकही रुग्ण सापडलेला नाही,अशी माहिती कांदिवलीच्या आर-दक्षिण विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ.नाजनीन खान यांनी दिली.