काँग्रेसच्या मोर्चात बैलगाडी तुटली; भाई जगताप आणि कार्यकर्ते जमिनीवर कोसळले

काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीविरोधात आक्रमक झालेली आहे. काँग्रेसकडून राज्यभर महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसन जनआंदोलन केलं. या जनआंदोलनाला वेळी बैलगाडी वर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते घोषणा देत होते आणि याच वेळेला कार्यकर्त्यांच्या अति उत्साहामुळे बैलगाडी तुटली आणि त्यामुळे या बैलगाडीवरुन भाई जगताप आणि कार्यकर्ते जमिनीवर कोसळले. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.

    मुंबई : काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीविरोधात आक्रमक झालेली आहे. काँग्रेसकडून राज्यभर महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसन जनआंदोलन केलं. या जनआंदोलनाला वेळी बैलगाडी वर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते घोषणा देत होते आणि याच वेळेला कार्यकर्त्यांच्या अति उत्साहामुळे बैलगाडी तुटली आणि त्यामुळे या बैलगाडीवरुन भाई जगताप आणि कार्यकर्ते जमिनीवर कोसळले. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.

    मोर्चेकऱ्यांच्या वजनाने तुटली

    काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चासाठी बैलगाडी आणली होती. अँटॉप हिल येथे बैलगाडीत उभे राहून गॅस सिलेंडर, इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी करत होते. लगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. आंदोलन सुरू असताना बैलगाडीत गर्दी इतकी वाढली की, त्या वजनाच्या भाराने बैलगाडी तुटली. सुदैवाने या मध्ये कोणालाही दुखावत झालेली नाही.