रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षा पुन्हा होणार; आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली महत्वाची माहिती

आरोग्य विभागाची रद्द झालेली परिक्षा ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवूनच रद्द करण्यात आली आता साधारणपणे १५, १६ ऑक्टोबर किंवा २२, २३ऑक्टोबरला पुन्हा ही परिक्षा होण्याची शक्यता आहे. ज्या संभाव्य तारखा असतील त्या शाळा सुरु होणार असल्याने नियोजन बघून ठरवल्या जातील. आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील तारखा ठरवू आणि पुढील तारीख लवकरच कळवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

    मुंबई : आरोग्य विभागाची रद्द झालेली परिक्षा ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवूनच रद्द करण्यात आली आता साधारणपणे १५, १६ ऑक्टोबर किंवा २२, २३ऑक्टोबरला पुन्हा ही परिक्षा होण्याची शक्यता आहे. ज्या संभाव्य तारखा असतील त्या शाळा सुरु होणार असल्याने नियोजन बघून ठरवल्या जातील. आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील तारखा ठरवू आणि पुढील तारीख लवकरच कळवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

    निवड आरोग्य विभागाने केली नाही

    सामान्य प्रशासना अंतर्गत असलेला आयटी डीपार्टमेंटने मागच्या आणि या सरकारच्या अनुषंगाने कंपन्यांची निवड केली होती. ही निवड आरोग्य विभागाने केली नाही. आरोग्य विभागाची जबाबदारी एकच होती, ती म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यामुळे ती कंपनी काळ्या यादीत आहे की नाही, हे पाहणे आयटी विभागाचे काम असते. आमच्या विभागाचा बाकी काही संबंध नसतो. तरीसुद्धा आमच्या विभागाने तपासल्यानंतर कंपनीने वेळ मागितल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

    “जवळपास ९५ टक्के काम झाले होते. मात्र, काही त्रुटी होत्या. म्हणूनच हॉलतिकीट १० दिवस आधी मुलांच्या हाती मिळतील, याची काळजी व्यवस्थित घेतली जाईल. आता कोणतीही ढिलाई दिसणार नाही. चांगल्या स्पिरिटने घ्यावे. १७ हजार जागा भरुन घेणे हाच आमचा हेतू आहे. आरोग्य सेवा सक्षम व्हावी, हा हेतू. आता न्याय देऊन सगळ्या जागा भरुन घेतल्या जातील.

    - राजेश टोपे, आरोग्यमंत्री