Manusakh Hiren Suicide? Manusakh Hiren's last mobile location found; Shocking twist in the case

मनसुख हिरेनच्या अपहरण आणि हत्येसाठी वापरली गेलेली कार पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी आपल्या मित्राकडून आणली होती. आपल्या मित्राच्या पांढऱ्या रंगाची फॉक्सवॅगन कार घेऊन माने आले असल्याचा उल्लेख सुनील मानेला सेवेतून बडतर्फ केल्याच्या आदेशात करण्यात आला आहे. हा आदेश मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केला आहे. त्यानुसार सुनील मानेने मुख्य आरोपी एपीआय सचिन वाझेकडील मोबाईल फोन आणि सिमकार्ड गोळा केले होते आणि मनसुख हिरेनचे अपहरण करण्यासाठी त्यांचा वापर केला होता.

    मुंबई : मनसुख हिरेनच्या अपहरण आणि हत्येसाठी वापरली गेलेली कार पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी आपल्या मित्राकडून आणली होती. आपल्या मित्राच्या पांढऱ्या रंगाची फॉक्सवॅगन कार घेऊन माने आले असल्याचा उल्लेख सुनील मानेला सेवेतून बडतर्फ केल्याच्या आदेशात करण्यात आला आहे. हा आदेश मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केला आहे. त्यानुसार सुनील मानेने मुख्य आरोपी एपीआय सचिन वाझेकडील मोबाईल फोन आणि सिमकार्ड गोळा केले होते आणि मनसुख हिरेनचे अपहरण करण्यासाठी त्यांचा वापर केला होता.

    विशेष म्हणजे, मानेने कांदिवली येथील पोलिस निरीक्षक तावडे यांचे नाव वापरून मनसुख हिरेनला फोन करून बोलाविले होते. घराबाहेर बोलाविल्यानंतर सुनील माने मनसुख हिरणला त्या ठिकाणी गेला, जिथे त्याची हत्या करण्यात आली होती. सुनील मानेला निलंबित करण्यात आलेल्या आदेशामध्ये पुढे म्हटले आहे की, मानेच्या घरातून एनआएला काही संशयास्पद कागदपत्रे मिळाली आहेत.

    तर एनआयएने सिद्धार्थ सिक्युरीटी अँड डिफेन्स कार्यालयाचीही झडती घेतली, जी सुनील मानेशी संबंधित आहे. या कार्यालयात चार गाड्यांची नोंदणी केलेले कागदपत्रांची झेरॉक्स, तीन अॅग्रीमेंट कॉपीची प्रत, ऑफिस आणि तीन बँकांचे पासबुक सापडले आहेत. त्याचबरोबर सुनील मानेच्या चौकशीमध्ये ठाणे आणि पालघर या जागांचाही उल्लेख आहे, जिथे गुन्ह्याशी संबंधित गोष्टी घडल्याचा संशय एनआएला आहे.