सीबीआयची टीम ‘या’ दिवशी मुंबईत होणार दाखल, सर्वात प्रथम करणार हे काम

सीबीआयने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या तपासणीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. हीच एसआयटीची टीम उद्या गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. या टीममध्ये २ एसपी आणि १ तपास अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला २ महिने झाले आहेत. अद्याप त्याच्या मृत्यूचे कोणतेही ठोस कारण समोर आले नाही. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी मृत्यूच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यामुळे सीबीआयची टीम उद्याच मुंबईत दाखल होणार आहे. सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाल्यावर प्रथम सुशांत सिंग राजपूतच्या घराची तपासणी करणार असल्याचे समजते आहे. तसेच सीबीआय नंतर मुंबई पोलीसांना भेटणार आहे. सीबीआय कोणताही विंलब न करता चौकशीला सुरुवात करणार आहे. 

सीबीआयने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या तपासणीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. हीच एसआयटीची टीम उद्या गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. या टीममध्ये २ एसपी आणि १ तपास अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे.